नागरिकांसाठी शासनाच्या विविध सवलती लागू

जिल्हाधिकारी : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती

नगर – जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती राज्य शासनाने जाहीर केली आहे. या तालुक्‍यातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीत शासनाने विविध सवलती लागू केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, नगर, नेवासे, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि श्रीगोंदे या तालुक्‍यात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार या तालुक्‍यात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती दिल्या जाणार आहेत.

संबंधीत विभागांनी या सवलतीची अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)