बाह्यवळण अन्‌ सोलापूर रस्ता होणार चौपदरी

file pic

लवकरच निविदा प्रक्रिया होणार सुरू

दुपदरी रस्ते सार्वजनिककडेच

नगर जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग करण्याचे जाहीर केले आहेत. त्यानुसार काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. परंतू जे रस्ते दुपदरीच राहणार आहे. असे सर्वच रस्ते राष्ट्रीय महामार्ग झाले असले तरी त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहणार आहे.

नगर – नगर शहरबाहेरील बाह्यवळण रस्त्यासह नगर- सोलापूर रस्ता चौपदरी होणार आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून निविदा देखील काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाह्यवळण रस्ता सध्या दुपदरी आहे. तो चौपदरी करण्याची जबाबदारी प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. विळद-निबंळक ते पाथर्डी रस्त्यावरील चांदबीबी महाल असा 40 किलोमीटरचा हा रस्ता आता होणार आहे. त्यासाठी 154 ते 160 हेक्‍टर जागा आवश्‍यक असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी सुमारे 700 ते 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीचा बाह्यवळण रस्ता हा विळद ते सोलापूर रस्तावरील वाकोडीपर्यंत होता. परंतू तो आता जामखेड रस्ता ते पाथर्डी रस्त्यापर्यंत करण्यात येणार आहे. असा तब्बल 40 किलोमीटरचा रस्ता होणार आहे.

या बाह्यवळण रस्त्यासाठी 11 गावांमधील जागा भूसंपादीत करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली असून त्याच्या जागा भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या तरी बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा रस्ता दुपदरी असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरू होणार आहे.

नगर-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे नगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत काम करण्याची जबाबदारी काढण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्‍यातील सोलापूर रस्त्यावरील चापडगावपर्यंत या कार्यालयाकडून चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही रस्त्याचा टीपीआर तयार करण्यात आला असून आता निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

याबरोबरच नगर ते शिर्डी या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. हा रस्ता सध्या चौपदरी असून तो सहा पदरी करण्याचा विचार आहे. त्यानुसार सध्या या रस्त्याचे टीपीआर करण्याचे काम सुरू आहे. तसेच नगर- पुणे, नगर- औरंगाबाद या रस्त्याचाही टीपीआर करण्याचे काम सुरू असून वाहनांची वर्दळ लक्षात घेवून हा रस्ता सहापदरी किंवा आठ पदरी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)