निळवंडे, मुळातून आज जायकवाडीकडे पाणी झेपावणार

संग्रहित छायाचित्र..

सकाळी 8 वाजता निळवंडेतून 9 हजार क्‍युसेकने पाणी सोडणार; विखे कारखान्याची याचिका फेटाळली

अकोले  – नगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडू नये, या मागणीची पद्‌मश्री विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आल्याने जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्गा मोकळा झाला आहे. तसेच अकोलेकरांनी सुरू केलेले आंदोलन आज मागे घेतल्याने सकाळी 8 वाजता निळवंडे धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

अकोले तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी अकोले तालुका पाणी बचाव सर्वपक्षीय संघर्ष कृती आंदोलन सुरू केले होते. मात्र त्यांचा मागणीला न्याय मिळण्याची चिन्हे दिसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. आज (दि.1) सकाळी 9 हजार क्‍युसेकचा विसर्ग निळवंडेतून सोडण्यास सुरवात झाल्यावर भंडारदरा धरणातूनही त्यावेळी 10 हजार क्‍युसेकचा विसर्ग किमान 3 ते 4 दिवस सुरु राहील. किमान 5 ते 6 दिवस हे आवर्तन सुरु राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याला जलसंपदा अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या सकाळी 8 वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. त्या आदेशानुसार निळवंडे धरणातून 3.85 टीएमसी आणि मुळा धरणातून 1.90 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून सुरुवातीला 9 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर 4 तासांनी 2 हजार क्‍युसेक आणि पुन्हा 4 तासांनी 2 हजार क्‍युसेक, असा 10 हजार क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी विसर्ग कमी होत जाईल.

याकाळात वीजपुरवठा 11 तास राहील. आवर्तन सुरु असतांना त्यात कपात केली जाणार नाही, असे सांगून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या टनेलमधून 1 हजार 800 व भिंतीवरून हा विसर्ग सुरू राहील. हा प्रवाह वाढीव असल्याने नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. शिवाय अकोले तालुक्‍यात प्रमुख 5 ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

न्यायालयीन आदेशाने हे आवर्तन सोडले जात आहे. त्यामुळे कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. कुणाचे विद्युत पंप जर नदीपात्रात असतील, तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. यात कुणाचे नुकसान झाले तर त्याला जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)