नगरपालिकेतर्फे संगमनेरातील अतिक्रमणे हटविली

संग्रहित छायाचित्र...

संगमनेर : नगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांतील अतिक्रमणे काढण्यात आली. आज (दि.29) सकाळी दहा वाजता नगरपालिकेतर्फे ही कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी स्वतः होऊन आपली अतिक्रमणे काढली.

भारतनगर, शिवाजी पुतळा, बसस्थानक परिसर ते गणेशनगर, भाजी मंडई, तसेच नवीननग ररस्ता त्याभागातील अतिक्रमण धारकांवर यावेळी कारवाई करण्यात आली. भारतनगर भागातील कत्तलखान्यापासून अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शिवाजी पुतळा ते बसस्थानक परिसरातील टपऱ्याच्या बाहेर आलेले पाल, पत्रे जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी काही टपरीधारकांनी जास्त नुकसान होऊ नये, म्हणून स्वतःच आपल्या दुकानासमोरील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाला मदत केली. टपरीधारकांचा थोडा विरोध झाला. परंतु प्रशासनाने संबंधितांना पूर्वीच कारवाईच्या निटिसा दिल्याने किरकोळ वाद वगळता कारवाई सुरळीत पार पडली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

संगमनेर तालुक्‍यात दुष्काळाची परिस्थिती असताना बाजारपेठा ठप्प पडली आहे. त्यातच ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर अतिक्रमणे काढण्याची कारवाई करून नगरपालिकने दुकानदारांना रस्त्यावर आणले आहे. सणासुदीच्या काही दिवसांत शहरातील बाजारपेठ फुलली असताना आमच्यासारख्या गरीब दुकानदारांच्या पोटावर पाय देण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्‍न टपरीधारकांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)