झेंडीगेटमधील बेकायदेशीर कत्तलखान्यात सहा टन गोमांस

नऊ जणांना अटक : शहर पोलिसांची कारवाई

नगर – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तेथून सहा टन गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी 14 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी शहर पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अब्दुल करीम शेख (रा. कोठला घासगल्ली), कासीम हासीम शेख (रा. मंगलगेट), सद्दाम अकबर शेख (रा. मुकुंदनगर), मुस्ताकिम जानेमियॉं कुरेशी (रा. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ), आसीफ गुलाम दस्तगीर शेख (रा. हमालवाडा), उस्मान बिस्मील्ला शेख (रा. घासगल्ली), अयाज अहमद खुर्शीद (रा. मस्तानशाह चौक कोठला), मतीन बाबू शेग (रा. नवी भाजी मार्केट बीड), शाहरूख आश्रफ शेख (रा. वाहिदनगर, बीड) या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या आरोपींकडून सहा टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. छोटा टेम्पो, चार लहान जनावरे, दोन सत्तूर, आठ सुरे, दोन टोचे असा एकूण 14 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा कत्तलखाना बेकायदेशी होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे. उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)