कल्याण रोडवरील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

नगर  – कल्याण रोड परिसरामध्ये विद्या कॉलनीसह विविध कॉलन्यांची वसाहत 40 वर्षांपासून निर्माण झालेली आहे. नगर शहराच्या हा भाग अत्यंत जवळचा आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आपले वास्तव्य करीत आहेत. परंतु महापालिकेच्या माध्यमातून या भागाला पूर्ण सुविधा दिलेल्या नाहीत. या भागातील नागरिक हे नोकरदार आहेत. 12-12 ते 15-15 दिवस या भागाला पाणी सुटत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यासाठी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांना विद्या कॉलनी परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे.

लवकरात लवकर कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्‍न निकाली काढावा व भागातील नागरिकांना मुबलक पाणी द्यावे. त्यांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबवावेत. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी आता रस्त्यावर यावे लागत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जातीने लक्ष घालून आमचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली काढावा. अन्यथा या भागातील नागरिकांना रस्त्यावर यावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागातील नागरिक हे सहनशील आहेत. त्यामुळे महापालिका सुविधा देत नाही का? यासाठी तुम्हीच आता लक्ष घालणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या पाण्याची समस्या सविस्तरपणे जाणून यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन यावेळी या परिसरातील नागरिकांना दिले. या भागात 15 ते 20 हजार लोकवस्ती आहे. या भागात पाणीच येत नसल्याने नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. यावेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, काटे , खोटे , दत्ता गाडळकर, विजय गाडळकर, प्रद्युन्म सोनवणे, अभय शेंडगे, अग्रवाल, पांढरे, रितेश आडेप आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)