शबरीमलय महिला प्रवेशाला विरोध करण्यासाठी केरळींचे आंदोलन

नगर – शबरीमलय अय्यप्पा सेवा समाजम नगर जिल्हयाच्या वतीने काल शबरीमलय मधील परंपरा कायम राहण्यासाठी सावेडी उपनगरातून केरळी बांधवांचा स्वामी शरणम, अय्यपा शरणम नामजप करीत तेथील मंदिरात महिला प्रवेशाला विरोध दर्शविण्यासाठी पदयात्रा काढली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

अय्यप्पा सेवा समाजम नगर जिल्हा अध्यक्ष- उदयकुमार के,सचिव: अजित के नायर,संयुक्त सचिव स्मिता कंबलथ,खजिनदार पी सथ्यम ,सल्लागार सदस्य के एस बाबूशेठ ,विजय हेगडे,केशवन नंबूथिरी ,मुरलीधरन नायर,के गोपालकृष्णन, वसंतसिंह आदी सह मोठया संख्येने अय्यप्पा भक्त सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केरळ येथील शबरीमलय मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा कोर्टाने जो निर्णय दिला.त्यासंदर्भात 13 रोजी सुनावणी आहे , तो निर्णय कोर्टाने मागे घावा या मागणीसाठी शहरात आज शांती यात्रा काढून विरोध दर्शविला.सावेडीतील आकाशवाणी येथील लक्ष्मी माता मंदिरापासून भगवान अय्यप्पा यांच्या मूर्तीला हार अर्पण करून पदनाम यात्रा सुरु झाली. यावेळी शबरीमलय वाचवा, संस्कृती संवर्धन करा, असे फलक हाती घेऊन भाविक स्वामी शरणम, अय्यपा शरणम असा नामजप करीत होते.प्रोफेसर कॉलनी चौक ,भिस्तबागरोड मार्गे श्रमिकनगर येथून रेणावीकरनगर मधील अय्यप्पा मंदिरात सांगता झाली.

शबरीमलय च्या परंपरा कायम राहण्यासाठी भारतात सर्वत्र पदनाम यात्रा काढण्यात येत आहे. केरला, तामिळनाडू, आंध्रप्रेदेश, कर्नाटक नंतर महाराष्ट्रात रोज विविध ठिकाणी अय्यप्पा भक्त या यात्रा काढत आहे , आज नगरमध्ये काढण्यात आली आहे.

अय्यप्पा ची कोणीही महिलाभक्त मंदिरात जाण्याचा हट्ट करत नाही व करणारहि नाही हे आजच्या महिलांच्या उपस्थिती वरून लक्षात येत आहे शबरीमलय मंदिरात सर्व महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या निर्णयाचे केरळ सरकारकडून फक्त स्वागत करण्यात आले. मात्र सर्व धर्मातील लोकांना हा निर्णय मान्य नाही असे अजित के नायर यावेळी बोलताना म्हणाले.

वसंतसिह म्हणाले केरळमधील शबरीमलय येथील अयप्पा मंदिर वर्षातील साधारणपणे चार महिने भाविकांसाठी खुले असते. या मंदिरात रजोनिवृत्ती प्राप्त झालेल्या महिलांना प्रवेशास बंदी नाही; मात्र दहा ते पन्नास वर्षे या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास, तसेच पूजा करण्यास परवानगी नाही व ती हजारो वर्षाची परंपरा आहे केरळ येथील जगप्रसिद्ध शबरीमलय मंदिरात महिलांना प्रवेश करण्याच्या विरोधात हिंदूंनी सनदशीर मार्गाने उभारलेल्या लढा उभारला आहे.

अनेक ठिकाणी शबरीमलय मंदिराच्या आचारधर्माच्या रक्षणासाठी नामजप घोषयात्रा काढण्यात आल्या. यांत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. केवळ केरळच नाही, तर भारतातील अनेक शहरांमध्ये, तसेच ऑस्ट्रेलिया, केनिया आदी देशांतील अय्यप्पा भक्तांनीही शांतता मार्गाने निषेध आंदोलने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)