‘अवघा रंग एक जाला’ ‘भैरवीने नगरकर भारावले

नगर – ‘अवघा रंग एक जाला ‘ या ‘भैरवी’ रागातील भक्ती गीताने पटवर्धन स्मारक सभागृहातील श्रोते भारावून गेले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यामध्ये गायक होत्या औरंगाबादच्या मानसी कुलकर्णी, बंदिश सांगितिक कला, प्रतिष्ठान आयोजित संगीत मैफिलीत तिने गाणे सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक कलाकार अमृता बेडेकर यांचे गायन सादर झाले. मधुवंती रागातील ‘हे लाल के नैन’ बंदिश तिने विलंबित व छोटा ख्याल द्रुत तीन तालात सादर केला. त्याच रागातील ‘तराणा’ व’ नरवर कृष्णा समान’ हे नाट्यगीत गाऊन श्रोत्यांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे उद्घाटन बंदीश सांगितिक कला प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी अध्यक्ष डॉ. मधुसुदन बोर्डीकर व कुमुदिनी बोपर्डीकर तसेच मानसी कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वतीच्या प्रतिमेस हार घालून झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वरमंचावर मानसी कुलकर्णी यांनी बिहाग रागाने कार्यक्रमाची सुरुवात केली. विलंबित झुमरा तालात ‘मन लागेना तोरे बिना’ ही बंदीश सादर केली. आकर्षक स्वरलगाव, सरगमच्या द्रुत ताना व बेहेलावे लक्षवेधी होत्या. ‘अब बहू लाल न मै’ ही द्रुत तीन तालातील बंदीस चपळतेच्या तानांनी खुमासदार झाली. तालाच्या अंगाने बढत व तानेतील चापल्य वाखाण्याजोगे होते. प्रचंड टाळ्यांनी श्रोत्यांनी या कलाकृतीस दाद दिली. यानंतर मध्यलय झपतालातील व परज रागातील चीज सादर झाली. त्यास जोडूनच ‘मैं क्‍यू चली जमुना’ ही एक ताली रचना देखील दाद देऊन गेली. राग मालेतील राग बदलाने व रागांतील स्वररचनेच्या बदलाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली प्रसिद्ध गीत व ‘खरा तो प्रेमा’ या नाटय़गीताने मैफिलीचा स्वर प्रवास द्विगुणीत झाला.’काय देहाशी आला’ हे भक्तिगीत सादर करून भक्तिमय वातावरणातच ‘अवघा रंग एक झाला’ हे स्वर्गवासी किशोरी आमोणकर यांचे गीत सादर होऊन मैफलीची सांगता झाली.

या सर्व कार्यक्रमात संवादिनीची समर्पक साथ दिली. मकरंद खरवंडीकर यांनी तर तबल्याची उत्तम साथ श्रीप्रसाद सुवर्णपाठकी यांची साथ होती. सूत्रसंचलन सुमेधा देशपांडे यांनी केले. लक्ष्मण डहाळे यांनी प्रास्ताविक केले. तर वर्षा पंडित यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व कार्यकारिणी सभासद व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात डॉ. कृष्णा पांडे, विना कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी चित्रकार वसंत विटणकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)