पाणी टॅंकरसह चारा छावणीसाठी कडूस ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन

सुपे – पारनेर तालुक्‍यातील दुष्काळाची पहाणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री राम शिंदे पारनेर पंचायत समितीमध्ये दुष्काळी बैठक पार पडल्यानंतर श्रीगोंदे तालुक्‍यातील सारोळा सोमवंशी येथे जाताना कडूस रस्त्यावरच ग्रामस्थांनी आवडले व निवेदन दिले.

निवेदनाद्वारे दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टॅंकर तत्काळ द्यावेत व जनावरांसाठी चारा छावणी मंजूर करावी अशी मागणी केली. यावेळी कडुस येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा उद्योजक संतोष गायकवाड, उपसरपंच दुर्योधन रायते, ग्रामपंचायत सदस्य संजय मुंगसे, दादा महाराज दिवटे, संजय रावडे, सोमनाथ लंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)