फटाकेमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थ्यांचे पथनाट्य

तक्षिला स्कूलचा उपक्रम

नगर – तक्षिला स्कूलमधील विद्यार्थ्यांनी माळीवाडा परिसरात फटाकामुक्त दिवाळी या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच या पथनाट्याद्वारे फटाक्‍याच्या प्रचंड आवाजामुळे आजारी व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच बालकांच्या हृदयावर होणारा परिणाम, फटाक्‍यांच्या धुरामुळे वायूप्रदुषण होऊन श्‍वसनाचे निर्माण होणारे आजार, वातावरणातील कार्बन मोनॉक्‍साईडचे वाढते प्रमाण याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रेक्षकांकडून या पथनाट्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. या पथनाट्यामुळे जनजागृती होऊन प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत, आम्ही फटाका मुक्त दिवाळी साजरी करू, अशा प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. या पथनाट्याला स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)