तूटीच्या खोऱ्यात पश्‍चिमेचे पाणी वळवा – कोल्हे

केंद्रीयमंत्री गडकरींना मागणीचे निवेदन

कोपरगाव  – उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असल्यामुळे या खोऱ्यातून पाण्याचे वाटप होवु शकत नाही. परिणामी येथील शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना धोक्‍यात आल्या आहेत. त्यासाठी पश्‍चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी पूर्वेकडे वळवुन नदीजोड कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने निधी देवुन हा प्रकल्प मार्गी लावावे, अशी मागणी गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यांना याबाबत प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. ना. गडकरी नाशिक येथे विविध कार्यक्रमासाठी बुधवारी आले असतांना आ. कोल्हे यांनी त्यांची भेट घेवून निवेदन दिले. समन्यायी पाणी वाटपाच्या फटक्‍यामुळे तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय घेतल्याने तसेच चालुवर्षी पाऊस न झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची तसेच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाबाबत चर्चा केली.

शंकरराव कोल्हे म्हणाले, जलसिंचन आयोगाचे तत्कालिन अध्यक्ष डॉ.माधवराव चितळे यांनी पश्‍चिमेचे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे वळविल्याखेरीज नगर नाशिकसह मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न सुटू शकणार नाही, असा अहवाल शासनास सादर केलेला आहे. या अहवालानुसार शासनाने त्यास तत्वत: मान्यता देवुन पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून मंजुरी दिलेली आहे पण या कामाला गती नाही.

आ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, नदी जोड प्रकल्पांतर्गत पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याची योजना प्राधान्याने हाती घेवुन त्यास निधी मिळाल्यास त्याचा लाभ नगर नाशिकसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल अन्यथा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनेल. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातही पाण्याची मारामार आहे. परिणामी बारमाही गोदावरी कालवे तहानलेले आहेत, प्रत्येक वर्षी पर्जन्यमान कमी होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना व फळबागधारकांना बसुन कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. तुटीच्या पाण्याचे वाटप कधीच होत नाही. त्यासाठी पाणी वाढवावे लागणार असून त्यासाठी पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यास प्राधान्य द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)