पाथर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पाथर्डी – ट्रॅक्‍टरचे साहित्य नेण्याचा बहाणा करून अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना जवखेडे दुमाला (ता. पाथर्डी) येथे बुधवारी मध्यारात्री घडली आहे. योगेश एकनाथ जाधव याने हा प्रकार केला असून, पाथर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

जवखेडे दुमला येथे पीडित मुलगी आजी-आजोबा समवेत राहते. घटनेच्या दिवशी पीडितेची आईवडील बाहेरगावी गेले होते. बुधवारी पीडित मुलगी घरी एकटीच होते. मुलीची आजी शेजारच्या खोलीत झोपली होती. वडिलांच्या ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हर असलेला योगेश जाधव हा तिथे आला. त्याने तुझ्या वडिलांना विचारले असून, मला ट्रॅक्‍टरचे साहित्य न्यायचे आहे, असे सांगितले. यावर मुलीला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दहा ते पंधरा मिनिटांनी सामानाची जाधव याने घरात उचकापाचक केली. यानंतर त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

मुलीने आरडाओरड केल्यानंतर शेजारील खोलीत झोपलेल्या आजीला जाग आली. तिने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. यावर योगेशने दरवाजा उघडून तेथून पळ काढला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन योगेश एकनाथ जाधव याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)