शेवगाव पंचायत समितीस ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार

शेवगाव – यशवंत पंचायत राज अभियान 2017-18 राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना विभाग व राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर झाले असून शेवगाव पंचायत समितीला नाशिक विभागातील तृतीय क्रमांकाचे उत्कृष्ट पंचायत समिती पारितोषिक मिळाल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिली.

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. त्यामुळे पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करण्याचे दृष्टीने राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी सन 2005 – 2006 या आर्थिक वर्षापासून विभागस्तर व राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.

-Ads-

पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी सन 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही अभिनव पुरस्कार योजना यावर्षी देखील राबविण्यात आली आहे.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांकडून पंचायत राज संस्थांचे क्षेत्रिय पडताळणी अहवालावरून राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या नाशिक विभागातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्हयाला दोन सन्मान प्राप्त झाले आहेत.

राहता पंचायत समिती प्रथम, कळवण पंचायत समिती व्दितीय, तर शेवगाव पंचायत समितीला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. पाच लाख रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गटविकास अधिकारी भवारी म्हणाले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य सर्व विभागाच्या समन्वयाने केलेल्या कामकाजाचे हे फलित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)