कुकाणेत जिवाजी महाले जयंती उत्साहात

शाळेस वृक्ष संवर्धनासाठी लोखंडी संरक्षण जाळ्या भेट

कुकाणे – कुकाणे (ता.नेवासा ) येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित श्री संत सेना महाराज ग्रुप, युवक बचत गट व सकल नाभिक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शुरवीर शिवरत्न जिवाजी महाले जयंती सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केले होते. या जयंती निमित्ताने कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वृक्ष संवर्धनासाठी लोखंडी संरक्षण जाळ्या (ट्री गार्ड ) भेट देत नाभिक समाजाने एक अनोखा उपक्रम राबवून मोठया उत्साहात जयंती साजरी केली.

-Ads-

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दौलतराव देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. संतोष तागड, नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ पंडित, महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्याचे उपाध्यक्ष बापुराव भागवत, कारभारी गोर्डे, उमेश सदावर्ते, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास म्हस्के, नांदुरचे तंटामुक्त समिती अध्यक्ष रख्माजी लिपणे, केशव दंरदले, उपमुख्याध्यापक भाऊसाहेब घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

दोन महिन्यांपूर्वी नाभिक समाजसेवक संजय वाघ यांच्या पुढाकाराने संत सेना महाराज ग्रुप व युवक बचत गटाच्या वतीने शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या वृक्ष संवर्धनासाठी लोखंडी संरक्षण जाळ्या ( ट्री गार्ड) भेट देवून संवर्धनाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. प्रारंभी प्रमख पाहुण्यांच्या हस्ते शुरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांच्या सात फुट असलेल्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख व्याख्याते व साहित्यिक प्रा.डॉ. संतोष तागड यांनी सांगितले की, समतेसाठी घरावर तुळशीपञ ठेवून क्रांती करणारे शिवरायांचे मावळेही तितकेच निष्ठेने वागले. जिवाजी महाले यांचे प्रतापगडाचा रणसंग्रामाबरोबरच कार्य सुवर्णांक्षरांनी कोरावे असे आहे. क्रुरकर्मा अफजलखान संपविला म्हणून तर शिवरायांना कार्य करण्यास आणखी एकवीस वर्षे मिळाली. ब्राम्हणवादाने पछाडलेल्या या शूरविरास लेखणीद्वारे न्याय मिळालेला नाही.म्हणून इतिहासाला साक्षीभूत ठेवून आपणास भविष्य सजवायाचे आहे आणि देशाच्या विकासाला गती द्यायची आहे.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मार्गदर्शक अनिल पंडित, ग्रामविकास अधिकारी रामकिसन बटूळे, मेहमुद पठाण, नेवासा तालुका युवा संघटनेचे सचिव व नाभिक समाजसेवक संजय वाघ, ग्रुपचे अध्यक्ष संजय बोरूडे, दीपक पंडित, उपाध्यक्ष गोकुळ वाघमारे, सचिव संदिप वाघ, गणेश कदम, किशोर पंडित, प्रतिक वाघ, स्वप्निल माळवे, अमोल पंडित, अध्यापक नारायण खरड, बाबासाहेब आंधळे, रामकिसन कदम, ताराचंद कोकाटे, श्रीमती सिमा सोनवणे, शारदा टेकाडे, कल्पना पवार, सुमन पाटोळे, कामिनी बायस, गौरी डाके, जनाबाई काळे, सारिका हराळे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुभाष भागवत यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)