हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानी पालखीचे दर्शन

सुपे – पारनेर तालुक्‍यातील सुपे येथे शनिवारी (दि.6) रोजी सकाळी 6 वाजता तुळजाभवानी पालखीचे आगमन झाले. देवीभक्त व सुपे ग्रामस्थांतर्फे पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखी वाजत गाजत चावडीसमोर आल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. दरम्यान हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

दर्शनासाठी पालखी चावडीसमोर ठेवण्यात आली. शनिवारी दुपारनंतर शाळांना सुट्टी असल्याने परिसरातील हंगा, मुंगशी, म्हसणे, जातेगाव, घाणेगाव, वडनेर हवेली, पळवे, कडूस, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, रुईछत्रपती, आपधूप, वाळवणे, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, रायतळे, अस्तगाव आदी गावांतील भाविकांसह मुलांनी दर्शनाचा लाभ घेतला.

-Ads-

सायंकाळी 6 वाजता शिवकालीन जहागिरीच्या वाड्यामध्ये पालखी नेण्यात आली. या ठिकाणीदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गतवर्षी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संजयकुमार सोने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कुठलाही अनूचित प्रकार न घडता पालखी सोहळा उत्साहात पार पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)