स्ट्रीटलाईटचे काम निकृष्ट ,आत्मदहनाचा इशारा

File photo

सुपे – पारनेर तालुक्‍यातील रुईछत्रपती येथील ग्रामपंचायततर्फे 14 व्या वित्त आयोगातून सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याची सखोल चौकशी करा, अशी मागणी तुषार दिवटे व संदीप सखाराम साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रुईछत्रपती येथील ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून दिवटे मळा ते बेंद वस्ती असे स्ट्रीट लाईटचे काम सुरु केले आहे. सदर काम हे अंदाजपत्रकानुसार नसून राजकिय द्वेशापोटी व राजकीय सोयीनुसार केले आहे. सिमेंटचे पोल उभे करताना खडी व सिमेंटचा वापर न करता माती व दगडाच्या सहाय्याने पोल उभे केले आहेत. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

-Ads-

अयोग्य पद्धतीने काम करून कामाच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या कामात सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्याशी वारंवार काम सुधारणेबाबत चर्चा केली. मात्र, राजकीय आकसापोटी शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान केले आहे. वारंवार मागणी करुनदेखील ठेकेदार दडपशाहीने काम सुरुच ठेवत आहे.

सदर निवेदनाची दखल न घेतल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता, कामाच्या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिवटे व साबळे यांनी दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)