60 वर्षावरील ज्येष्ठांना 5 हजार निवृत्तीवेतनाची मागणी

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तहसीलदारांना निवेदन

राहुरी विद्यापीठ – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त, राहुरी येथील श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, श्रावण बाळ वार्धक्‍य निवृत्तीवेतन सहाशेऐवजी 2 हजार रुपये द्यावे. वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्यांस ज्येष्ठ नागरिक संबोधून, सर्व शासकीय सवलतींचा फायदा द्यावा.

ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 ची अंमलबजावणीसाठी आवश्‍यक खर्चाची तरतूद येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये किंवा प्रसंगी पुरवणी बजेटमध्ये करावी. ज्येष्ठ नागरिकांकरिता विनामूल्य आरोग्यविमा योजना ताबडतोब लागू करावी. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विभाग किंवा आयुक्तालय सुरु करावे. स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री त्याकरिता घ्यावे. 60 वर्षावरील शेतकरी व शेतमजूर तसेच दारिद्रय रेषेखालील मजूरांना दरमहा 5 हजारापर्यंत निवृत्ती वेतन द्यावे.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दगडू जाधव, उपाध्यक्ष यशवंत डवखर, सचिव सदाशिव पवार, खजिनदार परशुराम गिरगुणे, महाळू पाचरणे, प्रकाश सातभाई, बाबासाहेब भूजाडी, बाबासाहेब ताकते, नंदकुमार जेजूरकर आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)