बोल्हेगाव फाटा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी, आ. जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

File photo

नगर – बोल्हेगाव फाटा हा मनमाड रोडला जोडणारा परिसर आहे. एमआयडीसीमुळे या परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बोल्हेगाव फाटा येथील ड्रेनेजचा प्रश्‍न राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल भागवत व नागरिकांनी आंदोलन व पाठपुरावा करून मार्गी लावला. हे ड्रेनेजलाईनचे काम त्यानंतर मंजूर होऊन हे काम पूर्णही झाले. मात्र, रस्त्याचे काम बाकी असल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडत होती. हे काम व्हावे, यासाठी नागरिकांसमवेत भागवत यांनी प्रयत्न केले. महापालिकेत अनेक वेळा आंदोलन व पाठपुरावा केला.

अखेर या प्रश्‍नी भागवत यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार संग्राम जगताप यांनी या रस्त्याचे काम होण्यासाठी लक्ष घातले. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता हे काम मंजूर होऊन सुरू होणे सोपे काम नव्हते. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

-Ads-

आमदार संग्राम जगताप यांनी 27 नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत नागरी दलित उत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधीसाठी पाठपुरावा केला व ते काम अखेर मंजूर झाले आहे. आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व दळणवळणाच्या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल भागवत यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)