कोरठण खंडोबाचा 8 ऑक्‍टोबरला सोमवती पर्वणी उत्सव

हजारो खंडोबा भक्तांची जमणार मांदियाळी

नगर – राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असेलेल्या पारनेर तालुक्‍यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा येथे सहा महिन्यातून एकदा येणाऱ्या सोमवती अमवस्या पर्वणी उत्सव दि. 8 ऑक्‍टोबरला आयोजन करण्यात आले या दिवशी हजारो भाविक देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार करतील.

-Ads-

16 एप्रिलला सकाळी 6 वा श्री खंडोबा स्वयंभू मुर्तीचे मंगलस्नान व पुजा झाल्यानंतर सकाळी 7 वा महाअभिषेक व आरती होऊन भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे .स 11 वा श्री खंडोबा मंदिरातून सोमवती पर्वणी गंगासकन साठी खंडोबा उत्सव मुर्तीची पालखी मिरवणूक वाजत गाजत प्रस्थान करणार आहे प्रवेशद्वार स्वागत कमानी पासून उत्सव मुर्तीसह पालखी नवीन शाही रथातून टाक्‍याचा दरा येथे प्रस्थान करेल.

यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात भाविक पालखीपुढे ओलांडा घेतात यावेळी ढोल ताशाच्या गजरात व लेझीम च्या डावात सदा आनंदाचा येळकोटच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जात.लंगर तोडल्यावर भाविकानी पालखीवर भंडारा खोबऱ्याची उधळण करतात व पालखी डोंगरावरून खाली उतरण्यास सुरवात होते.

पालखी मिरवणूक हजारो भाविकासह टाक्‍याचादरां येथे आल्यावर उत्सव मूर्तीचे पंचामृताने ब्रम्हवृंदाच्या मंत्र घोषात पूजन करण्यात येते व गंगास्नान घालण्यात येणार आहे त्याच वेळी भाविकांनी आपल्या घरातील टाक स्वरूपातील देवांना हि गंगास्नान घातले जाते व देवाची भेट घडवली जातेकोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’म्हणत सार्वजनिक तळीभंडार,महाआरती होऊन पालखी मिरवणूक मंदिरात परत येते.

सकाळी 12 वा पासून घुले,मुंढे शिंदे,खोसे,डावखर,घोडके या परिवाराकडून भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे .ग्रामस्थ व भाविक घरामागे भाकरी प्रसाद म्हणून घरून घेऊन येतात तर जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक प्रसाद वाटपाचे काम करतात.

देवस्थान समितीकडून भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था ,वाहनतळ आदि सुविधा पुरविण्यात येतात तरी सर्वानी या सोमवती पर्वणी उत्सवात देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे अध्यक्ष एड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सरचिटणीस महेन्द्र नरड,चिटणीस मनिषा जगदाळे,खजिनदार हनुमंत सुपेकर सर्व आजी-माजी विश्‍वस्त ग्रामस्थ,भक्तगण यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)