वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची रात्रपाळी झोपेत

दुरध्वनीच बंद करून चालतेय कर्मचाऱ्यांची रात्रपाळीची ड्युटी

संगमनेर – खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील कुरण रस्ता येथील नागरिकास शनिवारी रात्री वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा विचित्र अनुभव आला. खंडित वीज पुरवठ्याची माहिती देण्यासाठी या नागरिकाने तक्रार कक्षाच्या दूरध्वनीवर वारंवार संपर्क करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. समक्ष भेट दिली असता रात्रपाळीमध्ये काम करत असलेल्या हा कर्मचारी चक्क दुरध्वनीचा रिसीव्हर बाजूला ठेऊन ढाराढूर झोपल्याचे निदर्शनास आले.

-Ads-

शनिवारी रात्री दीड वाजता शहरातील अनेक भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. कुरण रस्ता परिसरातील वीज गायब झाली. प्रचंड उष्णता आणि डासांचा त्रास यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले. या परिसरात राहणारे जागृत नागरिक मोहसीन रशीद शेख याने त्वरित वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तक्रार कक्षातील 225925 हा क्रमांक बंद लागत होता. तब्बल दीड तास फोन लावून उत्तर न मिळाल्याने वैतागलेल्या मोहसीन याने रात्री तीन वाजता थेड वीजवितरण कंपनीचे कार्यालय गाठले.या ठिकाणचे चित्र पाहून तो थक्क झाला.

नागरिकांच्या तक्रारीसाठी ठेवण्यात आलेल्या फोनवरील रिसीव्हर बाजूला ठेऊन संबंधित कर्मचारी झोपलेल्या अवस्थेत आढळला. आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या दूरध्वनीची सुविधा करण्यात आली आहे. मात्र रात्री अनेकदा हा फोन बंद अवस्थेत असतो. नागरिकांच्या तक्रारी ऐकून न घेण्यासाठी व आपली झोपमोड होऊ नये, यासाठी कर्मचारी हा फोन बंद ठेवतात. असा अनुभव यापूर्वी अनेकांना आला आहे. यामुळे याठिकाणी आंदोलनेही करण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन नागरिकाची गैरसोय होणार नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान स्वतःला आलेला अनुभव आणि झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो मोहसीन शेख याने सोशल मिडीयावर टाकल्याने नागरिकांनी या कारभाराचा निषेध व्यक्‍त केला आहे.

नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या प्रकारांची शहानिशा करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करू.
– विश्वजित मोडक, सहाय्यक अभियंता संगमनेर शहर

 

प्रतिष्ठीत नागरिक थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. सामान्य माणसाला हे शक्‍य नसत. तक्रारी ऐकून घेण्यासाठी उपलब्ध असलेला दूरध्वन बंद असेल तर सामान्यांनी तक्रार कोणाकडे करायची. संबंधितांनवर कारवाई झाली पाहिजे.
– मोहसीन शेख, त्रस्त नागरिक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)