गतिरोधक बसविण्याची मागणी 

संग्रहित छायाचित्र

विद्यार्थिनींचे नायब तहसीलदारांना निवेदन

कर्जत – येथील कर्जत-बर्गेवाडी रस्त्यावर कन्या विद्या मंदिर व तहसिल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तातडीने गतिरोधक बसविण्याचे निवेदन येथील कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना दिले.

-Ads-

या मार्गावर सुमारे तीन हजार शालेय विद्यार्थी, तहसील कार्यालयात कामानिमित्त येणारे तालुक्‍यातील नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी आदींची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी अनेक मोठे आणि किरकोळ अपघात सतत होत असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. याबाबत वारंवार तोंडी पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची दखल संबंधित प्रशासन घेत नसल्याने हे लेखी निवेदन देण्यात आले.

या ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार भोसेकर यांनी यावेळी विद्यार्थिनी व शिक्षकांना दिले.

भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे शाळेसाठी ये-जा करत असताना मनात कायम भीतीचे सावट असते. अनेक अपघात आमच्या डोळ्यांसमोर झाले आहेत. यामुळे या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवावे. – सोनल सोनमाळी, विद्यार्थिनी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)