हिंदी भाषेस अनन्यसाधारण महत्व – डाॅ. अमोल बागुल

नगर – हिंदी भाषा आपली राष्ट्रीय भाषा असून आपल्या रोजच्या जीवनात तीचा पदोपदी उपयोग होतो. हिंदी अनुवादाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याने राजभाषाचे विविध क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे प्रतिपादन डॉ. अमोल बागुल यांनी केले. जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय अहमदनगर येथे हिंदी विभागाद्वारे हिंदी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ.बागुल यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. वराट होते. महाविद्यालायाच्या हिंदी विभागाद्वारे दरवर्षी 14 ते 30 सप्टेंबर या काळात हिंदी पंधरवडा आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा.एस.बी, दहातोंड़े यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. के.बी.ताके यांनी केले. संगणक विभागाच्या प्राध्यापिका एकता गांधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी प्रा.श्रीराम मरकड़, प्रा. पुरुषोत्तम फटांगरे, प्रा.हमिद सय्यद, प्रा.महेश चोपड़े, प्रा.गीता सोनवने, प्रा.पूनम खरड यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)