नगर- आजच्या जागतिकीकरण व संगणकीय युगात शैक्षणिक वाटचाल करताना विविध शैक्षणिक आव्हाने विद्यार्थ्यांना पेलावी लागत आहे. ती आव्हाने समर्थपणे हाताळण्यासाठी संगणकीय ज्ञान असले पाहिजे आणि ते देण्यास महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.एम.वराट यांनी केले.

शेवगाव तालुक्‍यातील दहिगाव-ने येथील जनता शिक्षण प्रसार मंडळ संचलित नगर येथील मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वराट बोलत होते. यावेळी संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मनिषा गवारे, प्रा.एफ.बी.खान, कला शाखाप्रमुख प्रा. श्रीराम मरकड, विज्ञान शाखाप्रमुख प्रा.भारती पवळे उपस्थित होते. यावेळी 2017-18 या शैक्षणिक वर्षी अनुक्रमे प्रथम शबनम शेख, द्वितीय पूनम शेळके, तृतीय दिपाली कराळे या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रा. बी. व्ही. मुथा, प्रा.एच.एस.सय्यद, प्रा. एम.बी. भळगट, प्रा. एस.एन.साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन, विविध खेळ, संगीत खुर्ची, नेमबाजी, नृत्य स्पर्धाचे परिक्षक म्हणून काम पाहिले. यातुन मिस फ्रेशर विशाखा शिंदे व मिस्टर फ्रेशर सारंग शिर्के या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन विद्यार्थी शुभम वाघ व अक्षय वाघमारे यांनी केले तर आभार प्रा.एकता गांधी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)