मुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी

नगर -शेंडी गावचे शिवारातून अवैध मुरमाची वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकाला मुरम चोरांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. विक्रम सुरेश भगत, सनी भानुदासा देठे (दोघे रा. शेंडी, ता. नगर) या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कर्मचारी अनिल तोडमल यांच्या फिर्यादी दिली आहे. शेंडी गावच्या शिवारात विक्रम व सनी हे दोघांनी अनधिकृतपणे गौणखनिज केल्याचे समोर आले. डंपरमध्ये मुरम टाकून त्याची वाहतूक करत होते. परवाना असल्याची विचारणा केल्यावर या दोघांकडे तो नव्हता. रॉयल्टी देखील भरली नव्हती. पथकाने डंपर आणि जेसीबी तहसील कार्यालयात घेऊन येण्याचा प्रयत्न केला, असताना त्याला या दोघांनी विरोध केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)