लोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली

18 कोटी 58 लाख रुपयांची दाव्यांच्या तडजोडीतून वसुली

नगर – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये सुमारे दोन हजार 48 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यातून 18 कोटी 58 लाख 30 हजार 320 रुपयांची वसुली झाली. दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्हा न्यायालयात जिल्हा रविवारी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने प्रधान जिल्हा व सत्र न्यायधीश कमलाकर कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत (लोकन्यायालय) चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप व पक्षकार सुशीला केदार यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले.

जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे, जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशमुख, बार असोसिएशनचे अध्यक्ष शेखर दरंदले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीस पद्माकर केस्तीकर, न्यायाधीश एस. आर. नावंदर, न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी, जिल्हा प्रबंधक चंद्रकांत तरडे यांच्यासह पक्षकार, वकील आदी उपस्थित होते. या लोकअदालतमध्ये खटलेपूर्व प्रकरणे 5 हजार 154 व प्रलंबित प्रकरणे 12 हजार 382, असे एकूण 17 हजार 536 प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. मोटर अपघात, महावितरण, लवाद दरखास्ती, दिवाणी अपिले, विशेष दिवाणी दावे, 138 ची प्रकरणे, बॅंक प्रकरणे, नियमित फौजदारी प्रकरणे आणि बीएसएनएलच्या प्रकरणांचा समावेश आहे.
बॅंक प्रकरणांमध्ये सर्वाधिक दोन कोटी 99 लाखांची तडजोड झाली. त्यात नऊ हजार 344 प्रकरणांचा समावेश होता. लोकन्यायालयास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

दिवाणी दावा दाखल होण्यापूर्वी झाली तडजोड

लोक न्यायालयात विशेष घटना घडली. फसवणूक केल्याच्या प्रकरणात पक्षकाराने सामंजस्याने तडजोड केली. खरेदीदाराने झालेला दस्त चुकीचा आहे, हे मान्य करत मुळ मालकास त्याची स्थावर मिळकत परत केली. ही तडजोड करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश पद्माकर केस्तीकर यांनी यापूर्वी बैठक घेवून दोन्ही पक्षकारांत समझोता घडवून आणला. ज्येष्ठ विधिज्ञ ए. के. गुगळे यांनी सहकार्य मिळाले. या प्रकरणात आज लोक न्यायालयात न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांच्यापुढे अंतिम तडजोड झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)