श्रीगोंद्यात सिनेस्टाईलने भरदिवसा दीड लाख पळविले

श्रीगोंदा – शहरातील नगर अर्बन बॅंकेत नातेवाइकांकडून दीड लाख रुपये घेऊन टाकळी लोणारकडे जाण्यासाठी निघालेल्या पितापुत्रांना मांडवगण रस्त्यालगत किराणा दुकानात थांबले असता दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हुलकावणी देत दुचाकीवर बसलेल्या वडिलांकडील दीड लाख रुपये असलेली पिवळी पिशवी पळून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात बॅंकेच्या परिसरात पाळत ठेऊन नागरिकांचे पैसे पळवणारी टोळी अनेक दिवसांपासुन सक्रिय आहे. ही टोळी बॅंक ग्राहकांवर नजर ठेऊन ग्राहकांना हुलकावणी देऊन पैसे पळवत असल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. पाहुण्यांकडून दीड लाख रुपये उसने घेऊन रखमाजी नामदेव करणोर व नवनाथ करणोर हे टाकळी लोणारकडे जाण्यासाठी शहरातून जात असताना मांडवगण रस्त्याला ओंकार किराणा दुकानसमोर चहा पावडर घेण्यासाठी थांबले होते.

त्याचवेळी अनोळखी दोन व्यक्ती दुचाकीवर तिथे आले, त्यांनी दुकानाच्या मालकाला पाण्याची बाटली मागितली. भावात घासाघीस करत पाच रुपयाची बाटली दया असे म्हणत बाहेर येताना दुचाकीवर बसलेल्या वडिलांच्या हातातील दीड लाख रुपये असलेली पिवळी पिशवी घेऊन त्यांनी पोबारा केला असल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)