राहुरी : एकाच रात्री तीन मंदिरात चोरी

राहुरी – तालुक्‍याच्या पूर्व भागात ब्राह्मणी (जगदंबा देवी), उंबरे (मळगंगा देवी) व मानोरी (रेणुका देवी) मंदिर या तीन ठिकाणी गुरुवारी रात्री चोरी झाली. यामध्ये देवींचे दागिने व दान पेटीतील रोख रक्कमेचा समावेश आहे.

देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मुकूट असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तिन्ही मंदिरात दानपेट्या फोडल्या. गेल्या व त्या मधील रोख रक्कमेची चोरी झाली. राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व पोलीस पथकडून घटनास्थळी कसून तपास सुरू आहे.

-Ads-

दरम्यान, घटनास्थळी रक्षा या श्वानपथकास आणले गेले.परंतू विशेष माग मिळाला नाही. या चोरीचा त्वरीत तपास लागावा या मागणीसाठी आज कडकडीत बंद पाळला गेला. बंद शांततेत पार पडला. एकाच रात्रीत तीन मंदिरातचोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)