नगर : निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 131 वाहनांचे अधिग्रहण

नगर – लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वाहनांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 131 वाहनांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. निवडणूक कामांसाठी नियुक्त मनुष्यबळासाठी ही वाहने उपयोगात आणली जाणार आहेत.

याशिवाय, जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात नेमलेल्या विविध पथकांना ही वाहने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. निवडणूक काळातील कामकाज गतीमान पद्धतीने व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार वाहन पुरवठा व्यवस्थापन विषयक नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक कालावधीसाठी लागणारी वाहने, जिल्ह्यात उपलब्ध वाहने यांचा विचार करुन ही वाहने अधिग्रहीत केली आहेत.

तहसीलदार किरण सावंत-पाटील यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि खान यांनी यासंदर्भातील वाहने अधिग्रहित करण्याची कार्यवाही केली आहे. संबंधित लोकसभा क्षेत्रातील विधानसभासंघनिहाय आवश्‍यकतेनुसार ही वाहने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)