नगर : क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी निर्भिडपणे काम करावे – द्विवेदी

नगर – “निवडणूक काळात क्षेत्रिय अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी निर्भिडपणे कामे करून सोपविलेली जबाबदारी पार पाडावी,’ असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हा निवडणूक यंत्रणेक़डून विविध कामांसाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर उपस्थित होत्या द्विवेदी यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निवडणुक प्रक्रियेशी सबंधित कोणत्याही अफवावर विश्‍वास न ठेवता, भयमुक्‍त वातावरणात काम करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्राला भेटी देत केंद्रासंबधातील व परिसरातील सर्व अडचणीबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून अडचणी सोडविण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.

मतदान केद्रांतील परिस्थितीची पाहणी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्वभवणाऱ्या ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यात यावे. अडचणींबाबतचा आढावा घेत त्वरीत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी बीएलओशी समन्वय साधून मतदार यादीचे वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)