पिंपळे येथे विजेचा धक्का बसून विद्युत सहायकाचा मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील पिंपळे शिवारात विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून नितीन उत्तम कदम (वय 29) या विद्युत सहायकाचा मृत्यू झाला.

शनिवारी (दि. 23) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करून कदम यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)