अवैध दारू वाहतूक 31 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक

अकोले – टोयटो कंपनीच्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून संगमनेरवरुन अकोले शहरात अवैध विदेशी दारु वाहतूक करताना एकाला अकोले पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. तर गाडीसह 30 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर येथून टोयटो कंपनीची फॉर्च्युनर गाडी अवैध दारु घेऊन अकोले शहरात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली असल्याने अकोले पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सागर निपसे, विजय अगलावे, पर्बत, वाहन चालक सदाकाळ यांनी राञी सापळा रचला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान शहरातील महात्मा फुले चौकातील रासने कॉम्प्लेक्‍स येथे हॉटेल सुरभी जवळ ही गाडी पकडून तपासणी केली असता गाडीमध्ये अवैध विदेशी दारु, बिअर व व्हिस्कीचे बॉक्‍स आढळून आले.पोलिसांनी गाडी व मुद्देमालसह शिवकुमार मनोजकुमार कालडा (रा. नेहरू चौक, संगमनेर)यास ताब्यात घेतले.

यावेळी फॉर्च्युनर गाडी अंदाजे किंमत 30 लाख व किंगफिशर बिअर, नॉक आउट बिअर, लहान मोठ्या बाटल्या, ब्लॅक डी. एस. पी. व्हिस्की 90 व 180 मिलीच्या बाटल्या अशी 88 हजार 952 रूपये, विदेशी दारु असा एकूण 30 लाख 88 हजार 952 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सागर निपसे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)