खांडगाव शिवारातील 44 गुंठे ऊस जळून खाक

संग्रहित छायाचित्र....

संगमनेर  – संगमनेर तालुक्‍यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे. खांडगाव शिवारात सोमनाथ नबाजी गुंजाळ यांच्या 44 गुंठे ऊस वीजवाहक तार तुटून ठिणग्या उडाल्याने जळून खाक झाला. ही घटना आज दुपारी अडीच वाजता घडली.

गुंजाळ यांच्या शेतातून वीजवाहक तारा गेल्या आहे. त्यातील तार तुटून ठिणग्या उडाल्याने उसाला आग लागली. धुराचे लोट पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी जाळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. 70 ते 80 तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने व वारा असल्याने आग आटोक्‍यात आणणे शक्‍य झाले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उसाचे पीक तोडणीस आले असताना शॉर्टसर्किटमुळे डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गुंजाळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)