आवास योजनेचा 158 जणांना लाभ

श्रीगोंदे, संगमनेर, राहाता आणि पारनेरमधील लाभार्थी

नगर  – पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यातील 158 लाभार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले आहे. श्रीगोंदे येथील 45, संगमनेर येथील 48, राहाता येथील 58 आणि पारनेरमधील सात लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 12 हजार 203 लाभार्थींकडे घरे नसल्याचे समोर आले. त्यातील 1 हजार 776 जण शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कार्यवाही करत यातील 158 लाभार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले.

158 लाभार्थ्यांपैकी 48 जणांची शासकीय जागेत अतिक्रमणे होती. ती नियमित करून घेण्यात आली. 110 लाभार्थ्यांना जागा देण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्याला अर्धा गुंठा म्हणजे, 500 चौरसमीटर क्षेत्र देण्यात आले आहे. जागा वाटप करण्यात आलेले लाभार्थी गेल्या तीन पिढ्यांपासून अतिक्रमण करून राहत होते, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.

उर्वरीत लाभार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर वेगवान कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना खासगी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ योजनेतंर्गत 50 हजार रुपयापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची तरतुद आहे, अशीही माहिती द्विवेदी यांनी दिली.

अडीच हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

सहाय्यक उत्पादन केंद्र अलिम्को व भारतीय कृत्रिम अवयव केंद्र (जबलपूर) या भारत सरकारच्या उपक्रमाद्वारे जिल्हयातील 2 हजार 652 दिव्यांग व्यक्‍तींना 1 कोटी 50 लाख रुपयांची 41 प्रकाराची कृत्रिम अवयवाची, सहाय्यक उपकरणांचे साहित्याचे मोफत वाटप पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अलिम्कोचे संचालक डी. आर. शरीन, आयआरएफसीचे विजय शिरोडी, अशोक खेडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितिन उबाळे उपस्थित होते. अंध दिव्यांगांना मतदान यंत्रावर मतदान करणे सोपे व्हावे यासाठी आधुनिक चष्मे देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना जाणे सोपे व्हावे यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)