रस्ताबाजू शुल्क घोटाळा प्रकरणी मार्केट विभागप्रमुख भोसले निलंबित

नगर – रस्ता बाजु शुल्क वसुलीत आढळून आलेल्या घोटाळा प्रकरणी महापालिकेचे मार्केट विभागप्रमुख कैलास भोसले यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

शहरातील फेरीवाल्यांकडून महापालिका रस्ता बाजु शुल्क वसुल करते. महापालिकेच्या मार्केट विभागाकडे ही वसुलीची जबाबदारी आहे. या वसुलीसाठी महापालिकेने खासगी संस्थेला ठेका दिला होता. परंतू या संस्थेने वसुल केलेली रक्कम महापालिकेत जमा केली नाही. त्यामुळे द्विवेदी यांनी हा ठेका रद्द करून त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर रस्ता बाजु शुल्क वसुलीचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या संस्थेने रस्ता बाजु शुल्क फेरीवाल्यांकडून वसुल करुन ते महापालिकेत भरले नसल्याचे आढळुन आल्यानंतर त्याबाबत मार्केट विभाग प्रमुख कैलास हरिभाऊ भोसले यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. ही रक्कम भोसले यांच्या पगारातून वसुल करण्याबाबतही नोटीस काढण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात भोसले यांच्यावर ठपका ठेवत वसूल केलेली रस्ता बाजु शुल्कची रक्कम त्या संस्थेने महापालिकेकडे न भरता बेकायदेशीररित्या हडपली.

त्याबाबत भोसले यांनी महापालिकेला कोणतीही कल्पना, सूचना दिली नाही. कर्तव्यात कसुर व अफरातफर केल्याप्रकरणी भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. निलंबनाचे आदेश आयुक्‍त द्विवेदी यांनी शुक्रवारी रात्री काढले. या निलंबनाच्या कारवाईमुळे महापलिकेत खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात माहिती देताना द्विवेदी म्हणाले की, रस्ता बाजु शुल्कची वसुल केलेली रक्कम बेकायदेशीररीत्या हडप करणे तसेच अफरातफर केल्याप्रकरणी मार्केट विभाग प्रमुख भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीतावर कठोर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)