रस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक

नगर – शेवगाव ते गेवराई रस्त्यावर लूटमार करणाऱ्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. रवींद्र पोपट घुले (वय 19,रा. काटेवाडी, ता. पाथर्डी), अविनाश लक्ष्मण तांदळे (रा. वंजारवाडी, जि. बीड) या दोघांना अटक केली आहे. सिद्धार्थ संजय जाधव (रा. शिरापूर, जि. बीड) हा तिसरा पसार झाला आहे.

सचिन गटकळ यांना 14 फेब्रुवारीला कऱ्हे टाकळी शिवारात लुटले होते. रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकूण 40 हजारांचा मुद्देला या तिघांना लुटला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना या परिसरातील लुटमारीतील चोरांची माहिती मिळाली होती. त्यानुसार रवींद्र घुले याला काटेवाडी येथून ताब्यात घेतले. रवींद्र घुले याने साथीदारांची नावे सांगितले. त्यानुसार अविनाश तांदळे याला ताब्यात घेतले. सिद्धार्थ जाधव मात्र पसार झाला.
रवींद्र घुले याने पोलिसांच्या चौकशीत ठुकरपिंपळगाव (ता. शेवगाव) येथे दुचाकीस्वाराला लुटल्याची माहिती समोर आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संदीप जवादे यांनी याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या लुटमारीत तिघांनी मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यातील सुमारे 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवींद्र आणि अविनाश या दोघांना शेवगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)