मद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध

तोफखाना पोलीस ठाण्यातील प्रकार : आष्टीतील मद्यपीविरोधात गुन्हा

नगर  – मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आणल्यानंर तिथे त्याने विषारी औषधप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. बापू तुकाराम पवार (रा. अंतापूर, ता. आष्टी, जि. बीड) असे विषारी औषध घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बापूवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्याविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे आणि दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी मोटार अधिनियमातील तरतुदींनुसार असे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बापू पवार हा आष्टीहून नगरमध्ये सासुरवाडीला आला होता. नगरमधील घासगल्ली येथे त्याची सासुरवाडी आहे. तिथे नातेवाईकांना भेटल्यानंतर तो दुचाकी घेऊन निघाला. त्यावेळी पत्रकार चौकात त्याला शहर वाहतूक शाखा पोलिसांनी पकडले. दुचाकीची कागदपत्रे तपासणी केली. त्यावेळी पवार हा नशेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेऊन त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्याला बसवून ठेवले होते. पोलिसांबरोबर पवार याने चांगलीच हुज्जत घातली. तोफखाना पोलीस ठाण्यात तो वावरला. सीसीटीव्हीमध्ये पवार याच्या हा प्रकाराची चित्रीकरण झाले आहे. पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतल्यावर पवार गडबडला.

पाणी पिण्याच्या बहाण्याने तो ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनसमोरील काही अंतरावर असलेल्या कुलरजवळ गेला. तिथे पाणी पितो असे सांगून पॅंटच्या खिशात ठेवलेली विषारी औषधाची बाटली काढली. त्यातील औषध त्याने पिले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या दक्षतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जिल्हा रुग्णालयात पवार याच्यावर उपचार सुरू आहे. विषारी औषधाने आणि दारूमुळे पवार याच्या पोटात आग उसळली आहे. पवारला सलाईन लावले असून, त्यातून औषधोपचार सुरू आहेत. त्याछी प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पवारविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)