गोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावामध्ये उलटसुलट चर्चा

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील गोपाळपूर गावात दिगंबर रायभान शेरे यांचा हजारो रूपये किंमतीचा ऊसाच्या वाढ्याचा चारा कोणीतरी अज्ञात व्यक्‍तीने मध्यरात्री दोनच्या सुमारास पेटून दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक चालू असून ते एका पॅंनलकडून उमेदवारी करत आहे. यामुळे गावामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत त्यांनी नेवासा तहसीलदार व पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून यात म्हटले आहे की, गोपाळपूरमध्ये माझ्या कुटुंबासोबत राहत आहे. माझा मुलगा ऊस तोड करून उदरनिर्वाह करतो.माझ्याकडे 8 ते 10 जनावरे असून सुमारे 40 हजार वाढ्याची वळई घराच्या जवळ रचली होती.

21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 2 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या वळई आग लावून नुकसान केले आहे. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु, सर्व वळई जळून खाक झाली. मी सध्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसुचित जातीचा या राखीव जागेसाठी उमेदवार असून याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व मला नुकसान भरपाई द्यावी असे त्यांनी तहसीलदार व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)