मनांतील दुवे जोडून भाजपला मजबुत करावे- आमदार कोल्हे

कोपरगाव – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असंख्य जनविकासाची कामे करत आहेत. त्यामुळे भाजप व सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी एकमेकींच्या मनांतील दुवे जोडून पक्ष संघटन मजबूत करावे, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

येथील पक्ष कार्यालयात कोपरगाव शहर व तालुका भाजपा महिला पदाधिकारी नियुक्ती व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यात आ. कोल्हे बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे तसेच विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कार्यकारिणीवर निवड झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार कोल्हे म्हणाल्या, भाजप पक्षाला शिस्त आणि जनकल्याणाचा मोठा वारसा आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या प्रश्‍नांवर कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्याद्वारे काम सुरू आहे.

कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे छोटे-मोठे प्रश्‍न पदाधिकारी सोडवतील. पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली, तर त्यातून उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्र व भारताचे भवितव्य घडेल. शासन आपल्या दारी सारखे उपक्रम विकासाचे माध्यम आहे. हागणदारीमुक्त गाव, शहर संकल्पनेत शौचालय अनुदानात बारा हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, अटल योजना, शेतकऱ्यांना वार्षिक अनुदान, अशा असंख्य योजना सुरू आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)