निळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे

अकोले – निळवंडे कालवाग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीची वाढीव नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, परंतू कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे. असे स्पष्ट मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्‍त केले. शिर्डीचा पुढील खासदार युतीचा होणार असेही ते म्हणाले.

तालुक्‍यातील कुंभेफळ येथील कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माधव कोटकर हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, सतिष भांगरे, उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, म्हाळादेवी सरपंच प्रदीप हासे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, अंकुश वैद्य आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा. लोखंडे म्हणाले, निळवंडे धरणाचे कालवे झाले पाहिजेत. यासाठी मुंबई पर्यंत जलदिंडी काढली. मतदारसंघात दोन वेगवेगळ्या भूमिका घेऊन चालत नाही. कालवे झाले पाहिजे. पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना जमिनीची नुकसानभरपाईसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालू व बाधितांना न्याय देण्याची भूमिका आहे. परंतू फक्‍त मतासाठी खोट बोलण्याची परंपरा नाही.

कालव्याचे सर्व आकृतिबंध कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळातील आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लोकांना पंतप्रधान मदतनिधी देता आला. तसेच सौभाग्य योजनाच्या माध्यमातून गरीबांना वीज, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅंस, जनधन योजनेतून बॅंक खाते, प्रधानमंत्री घरकुल योजना असे अनेक गरिबांना थेट लाभ देण्याची भूमिका केंद्र व पंतप्रधानांनी घेतली. याकडे वेधून खा. लोखंडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या मनात युती व्हावी, अशी इच्छा होती. तसा निर्णय उद्धव ठाकरे व अमित शाह यांनी घेतला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गणपत कोटकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा शिंगाडे, भाजपचे युवा उपाध्यक्ष अमोल कोटकर, संजय पांडे, माधव कोटकर, सखाराम कोटकर, रोहिदास कोटकर, दगडू कोटकर, संजय कोटकर, सकाहरी पांडे, विकास कोटकर, विशाल कोटकर, नवनाथ पांडे, प्रभाकर कोटकर, बाबासाहेब कोटकर, सखाराम पांडे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)