कोपरगाव स्टेट बॅंकेची सीटीएस प्रणाली बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

कोट्यवधीचे धनादेशाचे व्यवहार ठप्प

कोपरगाव – येथील स्टेट बॅंक शाखेतील सीटीएस प्रणाली गेल्या महिनाभरापासून बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ज्या खातेदारांनी बॅंकेकडे धनादेश वटविण्यासाठी जता केले आहेत ते पास न झाल्याने खातेदार हैराण झाले आहेत. स्टेट बॅंकेच्या वतीने ग्राहकांना अधिक उत्तम व दर्जेदार सेवा देण्यासाठी या प्रणालीमध्ये बदल करण्यात येत असल्याचे बॅंकेचे शाखाधिकारी आर. एल. कळंबे यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2018 यावर्षी मध्ये सर्व बॅंकांची धनादेश क्‍लेरिंग प्रत्येक तालुक्‍यातील स्टेट बॅंक काम पाहत होती. मात्र गेल्या एक वर्षापूर्वी संपूर्ण देशात धनादेश क्‍लेरिंगसाठी प्रत्येक बॅंक निहाय स्वतंत्र सीटीएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर हि प्रणाली कार्यरत झाली. ग्राहकांना तत्पर व योग्य सेवा बॅंकांच्या वतीने देण्यात सुरुवात झाली. मात्र गेल्या 29 जानेवारीपासून येथील स्टेट बॅंकेची हि प्रणाली बंद पडली आहे. त्यामुळे खातेदारांनी वटविण्यासाठी जमा केलेले धनादेश

बॅंकेच्या कार्यालयात पडून असून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. शाखाधिकारी आर. एल .कळंबे म्हणाले, मुख्य कार्यालयाच्या वतीने या प्रणालीमध्ये ग्राहकांना आणखी जास्त वेगाने, उत्कृष्ठ सेवा देता यावी, यासाठी प्रणालीत बदल केले जात असल्याचे कळविण्यात आले आहे. स्टेट बॅंकेच्या वतीने हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याने व शेजारील शिर्डी, श्रीरामपूर व संगमनेर येथील शाखेमध्ये देखील हि प्रणाली कार्यरत झालेली नाही आज किंवा उद्यापर्यंत सीटीएस प्रणाली पुन्हा वेगाने सुरु होईल. ही प्रणाली कधी सुरू होईल याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)