पुणे-नाशिक महामार्ग ठरतोय बिबट्यांच्या मृत्यूचा सापळा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू : दोन महिन्यांतील तिसरी घटना

संगमनेर :  पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटनेत वाढ होत आहे. डोळासणे गावाच्या शिवारात शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा महामार्गावर अपघाती मृत्यू होण्याची संगमनेर तालुक्‍यातील ही दोन महिन्यातील तिसरी घटना आहे.

बिबट्याचा वावर लोकवस्तीकडून आता महामार्गावर होत असल्याने बिबट्याच्या अपघाताच्या घटनांत वाढ होत चालली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येतो. महामार्गावर बिबट्याच्या अपघातानंतर हा मार्ग बिबट्यांच्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

मागील दोन महिन्यात डोळासणे शिवारात बिबट्याचा महामार्गावर दुसरा मृत्यू असून संगमनेर शहर बाह्यवळण रस्तावर गुंजाळवाडी महामार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना पहाटे बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हा नर बिबट्या 4 वर्षांचा होता. अपघातात गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदनापुरी घाटातील निसर्ग निर्वाचन केंद्रात नेण्यात आले. प्राणी संवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता या समस्यावर उपाय योजना करण्याचे आव्हान वन विभागासमोर निर्माण झाले आहे.

“पुणे-नाशिक महामार्गवर बिबट्यांना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. एक लेन ओलांडल्यानंतर दुभाजक येतो नंतर बिबट्याला गाड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे गरबडलेल्या बिबट्याला पुढे किंवा मागेजाताना गाड्यांचा अंदाज न आल्याने एखाद्या भरधाव वेगाच्या वाहनाची जोरदार धडक लागून अपघात होतात.
– निलेश आखाडे, वनक्षेत्रपाल संगमनेर (भाग 1)

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)