पैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान

कोपरगाव – येथील टाकळी रोडवरील साईआश औषध घर, जनरल स्टोअर्स हे दुकान नगरसेवक संदीप पगारे व त्यांच्या साथीदारांनी पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून दुकानदारास धक्काबुक्की करून आग लावली. या आगीत संपूर्ण मेडिकल दुकानातील माल भस्मसात झाला. याप्रकरणी संदीप पगारेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, सचिन निंबा शिरोडे यांचे टाकळीरोडवर साईआशा औषध घर, जनरल स्टोअर्स आहे. गुरुवारी (दि. 14) नगरसेवक संदीप सावळेराम पगारे, संदीप एकनाथ पगारे व आणखी एक जण, असे तिघे दुकानावर आले. संदीप पगारे याने पाण्याची बाटली मागितली. यापूर्वीही एका बाटलीचे पैसे पगारे यांच्याकडे उधार होते. ते पैसे मागितल्याचा राग पगारे यांना आला. त्यामुळे त्यांनी दुकानातील काउंटरचा दरवाजा तोडला व बळजबरीने दुकानात प्रवेश केला. तसेच फिर्यादी सचिन शिरोडे यांस शिवीगाळ करुन मारहाण केली.

माझी दहा रुपयांची किंमत करतो का? मी नगरसेवक आहे. तू कोणाकडे पैसे मागतो, समजते का? उद्या सकाळी दुकान उघडले तर तुमच्या दुकानासमोर येऊन तमाशा करील. तुमच्या नावे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी शिरोडे दुकानला कुलूप लावून गेले असता, मेडिकलला आग लावली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक संदीप सावळेराम पगारे, संदीप एकनाथ पगारे व आणखी एक, अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. नागरे पुढील तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)