बीएसएनएल कर्मचारी सोमवारपासून संपावर

नगर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारत दुरसंचार (बीएसएनएल)चे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत देशातील बीएसएनएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी सोमवार दि.18 फेब्रुवारीपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. नगर मधील बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी सोमवारी सकाळी कार्यालयासमोर निदर्शने करुन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करणार आहे.

जिल्ह्यातील 1 हजार कर्मचारी या संपात उतरणार आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे या राज्यातील कर्मचारी संपात उतरणार नसून, या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना बीएसएनएलच्या वतीने सोमवारी श्रध्दांजली देखील देण्यात येणार आहे.

-Ads-

बीएसएनएलला फोरजी स्पेक्‍ट्रम द्या, 15 टक्के वाढीसह वेतनाची पुनर्रचना अमलात आणा, बीएसएनएलच्या टॉवर्सचे आऊट सोर्सिंग बंद करा, बीएसएनएलच्या जमिनीचे व्यवस्थापन धोरण ठरवा, बीएसएनएलला बॅंकाकडून कर्ज घेण्यासाठी लेटर ऑफ कम्फर्ट द्या, सर्व मालमत्ता बीएसएनएलच्या नावावर करा आदि मागण्यांसाठी हे तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)