उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मारहाण

राहुरी – उधारीचे पैसे मागितले म्हणून राहुरी तालुक्‍यातील खडांबे येथील चार जणांनी शहरातील अख्तर रेडिएम या दुकानात घुसून दुकान मालक व त्यांचा मुलास केबलने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी शहरातील भागिरथीबाई शाळेच्या रस्त्यावर अख्तर ईसाक आतार यांचे अख्तर रेडिएमचे दुकान आहे.तालुक्‍यातील खडांबे येथील सुरेश काचोळे यांच्याकडे अख्तर आतार यांचे चार वर्षांपूर्वीचे नंबर प्लेट बनविल्याचे एक हजार रूपये बाकी होते. आतार यांनी काचोळे याचेकडे या एक हजार रूपये उधारीची मागणी केली. याचा राग आल्याने काचोळे याने 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान सफारी गाडीतून राहुरी येथील आतार यांच्या दुकानात आले.

यावेळी त्याच्याबरोबर अनोळखी तीन इसम होते. यावेळी काचोळे हा फिर्यादी आख्तर आतार यांना म्हणाला की, मी तुझे उधारीचे पैसे दिले नाही. असा बोभाटा का करतो. असे म्हणून काचोळे व त्याचे तीन साथीदार अनधिकृतपणे दुकानात शिरले व दुकानातील रेडिएम मशीन, कॉम्प्युटर आणि काऊंटरची तोडफोड करून लाखों रूपयांचे नुकसान केले.

आतार व त्यांचा मुलगा कैफ हे त्यांना म्हणाले, की दुकान असे नुकसान करू नका. यावेळी काचोळे व त्याचे तीन साथीदार यांनी आतार व त्यांचा मुलगा कैफ यांना कॉम्प्युटरच्या केबलने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत आतार यांचा मोबाईल गहाळ झाला असून लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटने बाबत आतार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत काचोळेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)