टॅंकर व दुचाकीच्या अपघातात एक ठार

पाथर्डी – तालुक्‍यातील फुंदेटाकळी फाटा येथे टॅंकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील रामेश्वर महाराज जाधव (रा.चिखलठाणा, ता.सेलू, जिल्हा परभणी) हे जागीच मृत्युमुखी झाले. तर त्यांच्या सोबत असणारे रेवन्नाथ वायभट हे किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ कळवूनही पोलीस तीन तास उशिरा घटनास्थळी पोहचले. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रामेश्वर महाराज जाधव व त्याचे सहकारी रेवणनाथ वायभट हे चिखलठाणा येथून दुचाकीवर आळंदी येथे कार्यक्रमानिमित्त चालले होते. यावेळी फुंदेटाकळी फाटा येथील वळणावर पाथर्डीकडून येणारे पाण्याचे टॅंकर व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघातात झाला. या भीषण अपघातात रामेश्वर महाराज जाधव हे जागीच मृत्युमुखी पडले. तर रेवणनाथ वायभट हे गाडीवरून उडून बाजूला पडले.

त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. फुंदेटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब फुंदे व तरुणांनी जाधव यांच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली व रात्री उशिरापर्यंत मदत केली. रामेश्वर महाराज जाधव यांचे पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)