बसच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू

शेवगाव – बसच्या पुढील चाकाखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. झुंजाबाई भाऊ वाघमोडे ( वय 70, रा. दिंडेवाडी ता. शेवगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात भागूजी शहाजी शिंदे (रा. दिंडेवाडी, ता. शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेवगाव आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच.14 बी. टी. 0447 ही शेवगावहून राहुरीकडे आज (दि.14 ) दुपारी 2.45 च्या दरम्यान चालली होती. त्याच बसमधून उतरुन वाघमोडे मळेगाव येथील चौफुल्यावर पुढील बाजून जात होत्या. मात्र चालकाने त्यांच्याकडे लक्ष न देता बस सुरु केली.

त्यावेळी त्यांना बसचा धक्का लागून त्या पुढच्या चाकाखाली सापडून जबर जखमी झाल्या. नागरिकांनी आरडाओरड करुन त्यांना बाजुला काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, असे तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी बसचालकाने तेथून पळ काढला. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गिरी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)