टेम्पोची सावेडी नाका येथे तीन वाहनांना धडक

टेम्पो घेऊन पसार होणाऱ्या चालकाला तरुणांकडून चोप

नगर : नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाका इंथ मोटारगाडी आणि दोन दुचाकी अशा तीन वाहनांना धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पोला तरुणांनी पाठलाग करून पकडले. टेम्पोच्या धडकेने मोटारगाडी व दुचाकीवरील काही जण जखमी झाले आहेत. तोफखाना पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नव्हती.

नगर शहरातून विळदकडे निघालेल्या हा टेम्पो चालक भरधाव वेगाने घेऊन चालला होता. चालक टेम्पो घेऊन वेगाने निघाला होता. सावेडीनाका येथे रस्त्याकडेला उभा असलेल्या मोटारगाडीला आणि दोन दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील एका लहान मुलाच्या पायाला टेम्पोने जोराची धडक दिली होती. मुलाच्या किंचाळीमुळे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर पळून चाललेल्या टेम्पोला कॉटेज कॉर्नरच्या अलीकडे तरुणांनी पाठलाग करून पकडले.

टेम्पोमध्ये चालक आणि त्याचा साथीदार होता. हे दोघे नशेत होते. तरुणांनी या दोघांना चांगलाच चोप दिला. तोफखाना पोलिसांनाही या अपघाताची माहिती दिली. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पो ताब्यात घेतले. टेम्पोवरील चालक आणि त्याच्या साथीदारांना रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारांनतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या अपघातीची तक्रार करण्यासाठी सायंकाळपर्यंत पोलिसांकडे कोणीही फिरकले नव्हते. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)