संगमनेरात धुम स्टाईलने गंठण लांबवले

शहरात गंठणचोर पुन्हा सक्रिय : आठ तोळ्यांचे गंठण ओरबाडले

संगमनेर – शहरात पुन्हा एकदा गंठण चोरीचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (दि.8) दोन वेगवेगळ्या घटनेत सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पहिल्या घटनेत चारुशीला अनिल देशमुख (वय 41, रा.अमृतवाहिनी कॉलनी, सह्याद्री महाविद्यालयासमोर, संगमनेर) या दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या मुलीसोबत किराणा दुकानाकडे जात असताना येथील नाशिक पुणे मार्गावरील डीएनएस बॅंकेजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण (अंदाजे किंमत 25 हजार) ओरबाडत चोरटे पसार झाले.

तर दुसऱ्या घटनेत अशाच वेशातील दोन दुचाकीस्वारांनी शहरातील साईबाबा मंदिराजवळ गंगामाई घाट येथे सावित्रा लक्ष्मीकांत कदरेकर (रा.जुना सराफा गल्ली, देगलूर, जि. नांदेड) यांची पाच तोळ्यांची सोन्याची नाळ (अंदाजे किंमत 96 हजार 600) ओरबाडून चोरटे पसार झाले. चारुशीला देशमुख यांनी शहर पोलिसांत अज्ञात दोन चोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)