पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

सोनई – सोनई-शिंगणापूर रोडवरील मुळा कारखाना यार्ड परिसर येथील कारखाना मालकीच्या विहिरीत ऊस तोडणी कामगार महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनई-शिंगणापूर रस्त्याजवळ मुळा कारखाना गाडी यार्डलगत असलेल्या विहिरीत संगीत नेमा धुमाळ (वय 45), (रा. सोनाळवाडी ता. पाथर्डी) ही महिला पाण्यात बुडून मरण पावल्याची माहिती महिलेचा भाऊ प्रभाकर भीमा सोनाळे याने सोनई पोलिसांना दिली.

ही महिला 7 फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे, पती नेमा नामदेव धुमाळ याने सोनई पोलिसांना दिली होती. पोलिसांनी महिलेचा शोध घेतला मात्र, महिला मिळून आली नाही. शुक्रवारी (दि.8) बुडून मरण पावल्याची महिलेच्या भावाने माहिती दिली. पोलिसांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढून, नेवासा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली.

या घटनेचा अधीक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)