महिलेला जातीवाचक शिवीगाळ; दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी

नगर – महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. राजेंद्र रावसाहेब तवार ऊर्फ राजू (वय 44, रा. माका, ता. नेवासे) व सुधाकर नानासाहेब निकम (वय 29, रा. माळेगाव, ता. शेवगाव), असे शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश आर. एस. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला आहे. सहायक सरकारी वकील ऍड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

तवार आणि शिंदे याला अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येकी दोन वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद या दोघांना भोगावी लागणार आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने आठवडे साधी कैदेची शिक्षा या दोघांना भोगावी लागणार आहे.

शेवगाव येथील पीडित महिलेला दमदाटी करून या दोघांनी घर पेटवून दिले होते. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचा राग येऊन दोघा आरोपींनी पुन्हा पीडित महिलेच्या घराच्या मागील बाजूने येऊन दरवाजा जाळला होता. यात घरातील कपाट आणि धान्य जळून नुकसान झाले होते. आरोपींनी महिलेला या घटनेच्या दुसऱ्या दिवशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित महिलेने याप्रकरणी पुन्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)